अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एकाच्या खिशातील 25 हजार रूपयांची रोकड व सोन्याची अंगठी लंपास केल्या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात डॉ. विजय मकासरे व साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी छावा संघटनेचे देवेंद्र लांबे यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, लांबे हे वाघाचा आखाडा येथे आपल्या मित्राकडे जात असताना एका मोटारसायकलवर विजय अण्णासाहेब मकासरे हा व त्याचे पाठीमागे एक अनोळखी इसम असे आले.
विजय मकासरे शिवीगाळ करुन गाडी साईटला घे असे म्हणुन लांबेंच्या गाडीचे समोरुन त्यांची मोटारसायकल आडवी लावली. त्यावेळी विजय अण्णासाहेब मकासरे याने गावठी कट्टा लावून माझ्या कानावर लावला व मला म्हणाला तु लई समाजकारण करतोस काय तुझ्यावर अॅट्रोसिटी करुन तुला संपवतो.
असे म्हणून विजय मकासरे याने मला धरून तु जर हालचाल केली तर तुला गोळी घालुन संपवुन टाकीन अशी धमकी दिली. त्याचे सोबत असलेल्या अनोळखी इसमाने लांबे यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशातील 25 हजार रुपये रोख व हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन घेतली त्यानंतर लांबे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
त्याठिकाणी रस्त्यावरुन जाणारे लोक जमा होवु लागल्याने ते दोघे त्यांचे मोटारसायकलसह पळुन गेले. देवेंद्र लांबे यांच्या फिर्यादीवरून डॉ. विजय अण्णासाहेब मकासरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास राहुरी पोलिस करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम