Battery life : तुमच्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी लाईफ वाढवायची असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स

Ahmednagarlive24 office
Published:

Battery life : प्रत्येक वाहनासाठी बॅटरी महत्त्वाची असते. परंतु,जर बॅटरी खराब झाली तर ते वाहन चालू होण्यास समस्या जाणवते. नवनवीन बाईकच्या किंवा स्कुटरच्या बॅटरी चटकन खराब होतात.

खासकरून इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी जास्त खराब होते. बॅटरी खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे बॅटरी वापरताना केलेल्या चुका. त्यामुळे तुम्हीही बॅटरी वापरताना काही चुका करत असाल तर त्या आजच टाळा.

सर्व्हिसिंग करताना घ्या काळजी

सर्व्हिसिंग करत असताना जर तुमच्या मोटारसायकलची बॅटरी काढता येण्याजोगी असेल तर तुम्ही ती काढू ठेवा. जर त्यात पाणी गेले नाही तर तुमची बॅटरी जास्त काळ टिकेल.

या गोष्टी ठेवा लक्षात

इलेक्ट्रिकल आणि हाय व्होल्टेज भागांवर थेट पाणी टाकू नका. कारण पाण्यामुळे बाईकच्या आतील भागांचे नुकसान होते. इलेक्ट्रिकल लाईन्स आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन नेहमी स्वच्छ करत जा. स्वच्छता केली तर इलेक्ट्रिकशी संबंधित कोणतीही समस्या जाणवणार नाही.

बंद करा MCB

जर तुम्ही कुठेतरी जास्त वेळ जात असाल तर तुम्ही तुमच्या स्कूटरचा MCB बंद करावा. त्यामुळे स्कुटर चालू करताना कोणती अडचण येत नाही.

व्यवस्थित पार्किंग करा

दुचाकी पार्क करताना ती थंड आणि कोरड्या, हवेशीर जागेत पार्क करा. एखादे आग विझवण्याचे यंत्र जवळ ठेवा.

अधिकृत सेवा केंद्रावर सर्व्हिसिंग करावी

जर तुम्हाला तुमच्या स्कूटरची बॅटरी जास्त वेळ टिकवायची असेल, तर अधिकृत सेवा केंद्रात जाऊन सर्व्हिसिंग करा. त्यामुळे कोणतीच अडचण येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe