अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना उधाण आले असून, या परिसरात दारू, मटका, जुगार अड्डे सर्रास सुरू आहेत. त्या अवैध धंद्यांवर कारवाई केली जात नाही.
पोलीसांकडे तक्रार करणार्यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैध धंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून,
या अवैध धंद्यांवर कारवाई करुन आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. भिंगार परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे.
तर मटका, जुगार अड्डे दिवसाढ्यवळ्या सुरु आहेत. सर्वांच्या नजरेस पडणारे हे अवैधधंद्यांकडे पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.
या ठिकाणी नेहमीच शहरातील मोठ्या गुन्हेगारांचा कायम वावर असतो. परंतु याकडे पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. भिंगार कॅम्प हद्दीत जुगार अड्डावरील एखादी कारवाई सोडली तर विशेषतः कोणतीही मोठी कारवाई काही दिवसांपासून झालेली नाही.
अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याने भिंगारमध्ये अवैध धंद्यांना उधाण आले असेल. परंतु याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.
अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती, दारुडे येथील नागरिक व महिलांना त्रास देण्याचे काम करीत आहे. पुढे त्रास वाढू नये म्हणून तक्रारदार देखील पोलीसांकडे जात नाही.
तर एखाद्या अवैध धंद्याची तक्रार जरी केली तर, त्यांचे नांव उघड होऊन गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून तक्रारदारांना त्रास देण्याचे काम सुरु होते. यामुळे पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल केल्या जात नाही आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष घालून भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved