अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या परिस्थितीचा अनेकजण स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे प्रशासनाकडून अशा भामट्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यातच संगमनेर तालुक्यात करोना बाधित रुग्णांवर बेकायदेशीररित्या उपचार करणे दोन डॉक्टरांना चांगलेच भोवले आहे. प्रशासनाने या दोन्ही रुग्णालयावर कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साकुर येथील डॉ. अविनाश रासने यांच्या श्री समर्थ हॉस्पिटल व डॉ. संजय टेकूडे यांच्या ओम साई हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये बेकायदेशीर रित्या करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. याबाबत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना माहिती समजली.
साकुर येथे जाऊन त्यांनी ही कारवाई केली. या रुग्णालयांमध्ये विनापरवाना रॅपिड अॅन्टीजेन किट द्वारे करोना रुग्णांची तपासणी सुरू असल्याचे आढळले.
यामुळे या रुग्णालयांना सील ठोकण्यात आले. रुग्णालयांची अधिक चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी साकुर येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना यावेळी प्रांताधिकारी यांनी सूचना केल्या आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|