औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्याची आयएमएची मागणी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनावरील अौषधांचा काळाबाजार खूप वाढला अाहे. सरकारचे कडक निर्बंध असताना ही इंजेकशन्स जास्त पैसे कशी मिळतात, याची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे, डॉक्टरना ही इंजेकशन्स मिळत नाहीत, परंतु तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, पोलिस ही इंजेशन्स सहज घेऊन येतात.

जिल्ह्यात येणार सर्व साठा व पुरवठा फक्त जिल्हाधिकारी व अौषध निरीक्षकांकडूनच होऊ शकतो. फक्त कोविड सेंटर्सना जर ही इंजेक्शन्स सरकारी कोट्यातून मिळत असतील,

तर ही इंजेक्शन्स बाहेर कशी मिळतात? काही ठिकाणी तर मूळ औषधात पाणी किंवा स्टरॉइड भरून विकण्याचे उद्योग सुरु आहेत.

त्यामुळे जीवितास धोका होऊ शकतो. अधिकृत बिलांशिवाय आणलेली इंजेक्शन्स रुग्णाला देण्याचा धोका हॉस्पिटल्स पत्करू शकत नाही.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे कोणतेही सभासद डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकाला ही इंजेकशन्स बाहेरून आणण्यासाठी प्रिस्क्रिपशन्स देत नाहीत, असेही पत्रकात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News