गर्दी टाळण्यासाठी नालेगावात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे -नगरसेवक गणेश कवडे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नालेगाव येथील शिव-पवन मंगल कार्यालयात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी सभागृहनेते तथा नगरसेवक गणेश (उमेश) कवडे यांनी केली आहे.

कवडे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन दिले आहे. शहर व उपनगरमध्ये सध्या महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जात आहे.

प्रत्येक केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, कोरोना संक्रमण वाढण्याचा धोकाही वाढला आहे. शहरामध्ये माळीवाडा येथील महात्मा फुले आरोग्य केंद्र, तोफखाना व बुरुडगाव रोड येथील जिजामाता आरोग्यकेंद्रावर लसीकरण सुरु आहे.

या ठिकाणी नागरिकांची व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्या 45 वर्ष पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून, ज्येष्ठ नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे.

लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिक सकाळीच लवकर येत असून, गर्दीमुळे जेष्ठ नागरिक व महिलांचे हाल होत आहेत. प्रत्येक केंद्रावर लसीचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना दररोज हेलपाटे मारावे लागत आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जेंव्हा 18 ते 44 वर्षापर्यंतच्या नागरिकांना लस देण्याबाबतचा आदेश महापालिकेस प्राप्त होईल त्यावेळेस या वयोगटाच्या नागरिकांना देखील लस देण्यात यावी,

गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने लसीकरण केंद्र नालेगाव येथील शिव-पवन मंगल कार्यालयात सुरू केल्यास इतर केंद्रावरील गर्दी कमी होणार असल्याचे कवडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe