सावेडीकरांसाठी महत्वाचे ! हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यातच नगर शहरामध्ये देखील याचा प्रादुर्भाव वेगाने होतो आहे. यामुळे प्रशासन आता सतर्क झाले आहे.

गेल्या काही दिवसांतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून सावेडीतील सिद्धीविनायक कॉलनी व परिसरात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला. महापालिकेने या संदर्भातील आदेश काढले आहेत. हा परिसर अत्यावश्यक सेवा वगळता 13 मे पर्यंत पुर्णतः बंद करण्यात आला आहे.

या भागातील नागरिकांना परिसराबाहेर जाण्यास आणि बाहेरील नागरिकांना या परिसरात येण्यास पुर्णतः मज्जाव करण्यात येणार आहे. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला.

नोकरीनिमित्त या भागातील नागरिकांना बाहेर जाणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापनाने कंटेन्मेंटची मुदत संपेपर्यंत संबंधित लोकांची नोकरीच्या ठिकाणीच राहण्याची सुविधा करावी, असेही आदेशात म्हटले आहे. आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe