विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे ! विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा या तारखेपासून सुरु होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यातच कोव्हिडचा वाढता प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेलेल्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

येत्या 12 जुलैपासून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका , पदवी , पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र आणि इतर अशा एकूण 284 अभ्यासक्रमांसाठी 4 हजार 195 विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.

मुख्य परिक्षेआधी याही सत्रात 8 ते 10 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. नेमके काय असणार परीक्षेचं स्वरूप? जाणून घ्या या परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीनं घेण्यात येणार आहेत. यात 60 प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे.

यातील 50 प्रश्नांची उत्तरं ग्राह्य धरण्यात येणार आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या गणित आणि संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण 30 प्रश्न विचारले जाणार आहेत.

त्यातील 25 प्रश्नांची अचूक उत्तरं ग्राह्य धरण्यात येतील अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहेत. तसंच या परिकसेच टाइम टेबल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

या अडचणी असल्यास विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे तक्रार करता येणार :- लॉग इन न होणे, मधेच लॉग आउट होणे, इंग्रजी किंवा मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, पेपर सबमिट न होणे,

विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोविड विषाणू बाधा झालेली असणे, विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए, सीईटी किंवा इतर परीक्षा एकाच दिवशी येणे अशी कारणं असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे तक्रार करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe