अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिक्षण विभागातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकदा का सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांची असाईमंेट रिपोर्ट आल्यानंतर १० दिवसांत निकाल घोषित करण्यात येईल.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शाळांना ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या असाईमेंटचे रिपोर्ट सबमिट करण्यासाठी मुदत दिली होती.
परंतु, मुंबईतील १७ टक्के शाळांनी रिपोर्ट सादर केला नाही. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर लागणार आहे.
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, १५ ते २० जुलैदरम्यान दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर आठवड्याभरात बारावीसाठी असाईमेंट फॉर्म्यूलाची घोषणा करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम