खातेदारांसाठी महत्वाची बातमी ! 2 दिवस एसबीआयच्या या सेवा बंद राहणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- देशातील सर्वात मोठी बँक म्हणून नावाजलेली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.

ती म्हणजे एसबीआयच्या काही सेवा आज (दि. 16 जुलै) आणि उद्या (दि. 17 जुलै) रोजी विस्कळीत होतील. दरम्यान याबाबतची अधिकृत माहिती एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ग्राहकांना दिली आहे.

एसबीआयने ट्विटरवर अशी माहिती दिली आहे की, सिस्टम मेंटेनन्ससाठी 16 आणि 17 जुलै रोजी काही सेवा बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPI या सेवांचा समावेश आहे.

एसबीआयने ट्वीट करत म्हटलं आहे की या सेवा 16 जुलै रोजी रात्री 10.45 ते 17 जुलै रोजी रात्री 01.15 वाजेपर्यंत या सेवा बंद राहणार आहेत. जवळपास 150 मिनिटांसाठी या सेवा बंद असतील. एसबीआयने यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

देशभरात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 22 हजाराहून अधिक शाखा आहेत.31 डिसेंबर 2020 च्या आकडेवारीनुसार, इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या 8.5 कोटी आहे,

तर मोबाइल बँक ग्राहकांची संख्या1.9 कोटी आहे. यूपीआयच्या ग्राहकांची संख्या 13.5 कोटीहून अधिक आहे.बँकेद्वारे या सेवा बंद केल्यामुळे बर्‍याच ग्राहकांची गैरसोय होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!