अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- नगर शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जास्त रूग्ण असलेला परिसर सील करण्यास सुरूवात केली आहे.
यावेळी कंटेन्मेंट झोन निश्चित करताना त्याची व्याप्ती कमी केली आहे. तसेच झोनबाहेर पूर्वी असलेला बफर झोन रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यात रूग्ण वाढ वाढत असली, तरी सर्वाधिक रूग्ण नगर शहरात वाढत आहेत.
नगर शहरातील उपनगर भागातील सावेडीत तीन ठिकाणी सूक्ष्म कंटेन्मेंट झाेन झाल्यानंतर सायंकाळी त्यात आणखी चार सूक्ष्म कंटेन्मेंट झाेनची भर पडली.
बाेल्हेगाव येथे तीन झालेले पूर्वीचे असे सर्व झाेन पकडल्यास नगर शहरात आता सूक्ष्म कंटेन्मेंट झाेनची संख्या दहा वर पाेहाेचली. सोमवारी दि. 15 मार्च या एकाच दिवशी नगर शहरात 229 नवीन रूग्ण आढळले.
त्यामुळे जिल्हा महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. रूग्ण वाढल्याने संबंधित परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील दहा ठिकाणी कंटेन्मेंट झाेन जाहीर नगर शहरात आतापर्यंत बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणी, तसेच आर्यन सोसायटी (बालिकाश्रम रस्ता), सिव्हील हडको,
कोहिनूर मंगल कार्यालयासमोरी जयश्री कॉलनी, माणिकनगर, निलायम सोसायटी, सारसनगर-चिपाडे मळा आणि केडगाव या दहा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत.
आर्यन सोसायटीमध्ये पाच विंग्ज आहेत. त्यातील बी आणि सी या दोन विंग्ज सील करण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी बंधने नाहीत.
तसेच ज्या घरामध्ये रूग्ण आढळलेले आहेत, त्या घराच्या आसपास असलेले चाप-पाच घरांचा समावेश कंटेन्मेंट झोनमध्ये करण्यात येत आहे.
संबंधित ठिकाणी बॅरिकेट, बांबू लावून त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच तेथे महापालिका कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|