अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.
घोड आवर्तन २७ मार्च रोजी पासून सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. घोड खालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे.
त्यानुसार संबंधित मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत अधिक बोलताना पाचपुते म्हणाले,
घोड धरणातून शेतीसाठी आवर्तन दि २७ मार्च 2021 रोजी पासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोडण्यात येणा-या पाण्याचा अपव्यय टाळून शेतक-यांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे व पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहन पाचपुते यांनी केले आहे.
तसेच १० मे पासून घोड मधून तिसरे आवर्तन सोडण्याचा ही निर्णय घेण्यात आलेला असून घोड नदी मध्ये ही गरज असेल तेंव्हा ३०० एम.सी.एफ.टी पाणी सोडण्यात येणार आल्याची माहिती आमदार पाचपुते यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













