अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- विद्यार्थाना साठी अत्यंत महत्वाचं माहिती समोर आली आहे ती म्हणजे अकरावी CET संदर्भात….११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षाअर्ज प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे.
काही तांत्रिक कारणामुळे वेबसाईट काही दिवस बंद होती. ती पुन्हा पुर्वरत करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आज (ता.२६) दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता.२८) अर्ज करता येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. अकरावी सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी http://cet.mh-ssc.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरत होते.
पण अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता तांत्रिक कारणांसाठी बोर्डाकडून ही वेबसाईट बंद करण्यात आली होती.
हि वेबसाईट पुन्हा एकदा पूर्ववत झाली असून आजपासून विदयार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यापूर्वी २० आणि २१ जुलै दरम्यान परीक्षेसाठी नोंदणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून या संकेस्थळावर अर्ज पाहता येईल.
यावेळी अर्ज पूर्णपणे सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. मात्र यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम