अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे.
यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून आज निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या
विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसास अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसह जवळपास सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या. यावर्षीचा बारावीचा निकाल परीक्षा न घेता मूल्यमापन पद्धतीवर जारी केले जाणार आहेत. यामध्ये दहावी, अकरावीचे मार्क आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांचे गुण यांचा विचार केला जाणार आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थानाही खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करावा
hscresult.11thadmission.org.in
hscresult.mkcl.orgmahresult.nic.in
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम