अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर काहीजण फिरायला जाण्याचा बेत आखात असतील तर लक्ष द्या… तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.
कारण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देशातील सर्व ऐतिहासिक स्मारके आणि संग्रहालये येत्या 15 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आज दिली.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांनो, ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी जाण्याचा बेत असेल तर आताच हा बेत रद्द करा. कोरोना महामारीमुळे सर्व संरक्षित स्मारके आणि संग्रहालये येत्या 15 जूनपर्यंत वा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
देशात एकूण 3,693 स्मारके आणि 50 संग्रहालये आहेत. या आधी 31 मेपर्यंत हे स्मारके आणि संग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम