अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात १०२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के इतका आहे.
राज्यात एकाच दिवशी २०,८५४ कोरोबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच आतापर्यंत एकूण २३,५३,३०७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण हे ८५.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९४ लाख ९५ हजार १८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७ लाख ४५ हजार ५१८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ७ हजार ४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर १६ हजार ६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात एकूण ३ लाख ३६ हजार ५८४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णाांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या २७,४५,५१८ झाली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ५८८८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण ४ लाख ४५ हजार ५६२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
सोमवारी २४ तासात १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर एकूण ४७,४५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.
मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून आज ३३ हजार ९६६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ कोटी १ लाख ७ हजार ३१६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|