अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी गाढवाला दूध पाजून केले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-दूध खरेदीचे दर वारंवार कमी केले जात असल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

दूध व्यवसायातील अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दूध उत्पादकांना दिलासा मिळावा, यासाठी दूध उत्पादक आपल्या मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत.

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांतीदिनी सोमवारी ( दि. ९) संगमनेर तालुक्यातील मंगळापुर येथे शासनाचा निषेध करत गाढवाला दुध पाजले.

या आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दू ध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत सरकारच्या विरोधात घोषणा डेत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे यासाठी निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट नोट बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करा. यासह असलेल्या इतरही मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe