एका क्षणात कुटुंबाच्या आनंदाला लागली दृष्ट ! अवघ्या बावीस वर्षांच्या तरुणीने…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील शीतल राजेंद्र देठे (वय २२, रा. देवळाली प्रवरा) असे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुर्दैवी म्हणजे याच वर्षी जानेवारीमध्ये शीतलचा साखरपुडा झाला होता.

साखरपुडा झाल्यानंतर घरी लग्नाची तयारी सुद्धा सुरु होती. फक्त तारीख काढणे बाकी होते. मात्र, कुटुंबाच्या आनंदाला दृष्ट लागली.

आंणि सोमवारी (ता. १२) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान देवळाली प्रवरा येथे राहत्या घरात शीतलने विषारी औषध प्राशन केले. घराच्या शेजारी असलेल्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला.

तिला तत्काळ लोणी येथे रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. काल (ता.१४) मंगळवारी दुपारी देवळाली प्रवरा येथे शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe