अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोप सारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला आहे.
गेल्या ५ वर्षात १७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
आताच्या घडीला देशात रस्ते आणि पायाभूत सुविधांचे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. या माध्यमातून प्रवास सुविधाजनक आणि गतिमान करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन असून आगामी काही दिवसांत पायाभूत सुविधा पूर्णपणे बदलतील.
असा विश्वास त्यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वांत मोठे लक्ष्य आहे.
ग्रीन एक्स्प्रेसवे कॉरिडोरचे नेकवर्क पूर्णपणे सज्ज असून यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि ३० किमी द्वारकाद्रुतगती मार्गाचा समावेश आहे.
देशातील सर्व प्रकल्पांवर १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना असेल. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल.
सीमेवरील रस्ते बांधण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केले जात आहे, असेही गडकरी म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|