Maruti Suzuki : ऑटोमेकर मारुती सुझुकी आपल्या एरिना लाइन-अपच्या निवडक मॉडेल्सवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. जे सध्या गाडी घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. लक्षात घ्या ही सूट जुलै महिन्या पर्यंतच मर्यादित असेल. चला तर जाणून घेऊया कंपनी कोणत्या गाड्यांवर किती सूट देत आहे…
मारुती सुझुकी अल्टो 800

कंपनीने आता या कारचे उत्पादन बंद केले असून आता फक्त उर्वरित स्टॉकवर मोठी सूट मिळणार आहे. सूट कारच्या व्हेरियंटवर अवलंबून असेल, मारुती सुझुकी अल्टो 800 वर सध्या कंपनी 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले 799 सीसी इंजिनद्वारे समर्थित आहे. ही ऑफर त्याच्या CNG मॉडेलवरही उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी अल्टो K10
Alto K10 पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि 1.0-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळते. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे. त्यात सीएनजीचा पर्यायही आहे. कंपनी या कारवर 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
मारुती सुझुकी एस प्रेसो
Maruti S Presso ला देखील Alto K10 सारखेच 1.0-लिटर इंजिन आणि दोन गिअरबॉक्स पर्याय मिळतात. तसेच त्यात सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. या कारवर 55,000 रुपयांपासून 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकी वॅगन आरच्या सर्व प्रकारांवर 45,000 ते 60,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Wagon R ला 1.0-लीटर आणि 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह CNG पॉवरट्रेन पर्याय देखील मिळतो. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी ही एक आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो
मारुती Celerio च्या मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंटवर सुमारे 65,000 रुपयांची सूट देत आहे. त्याच्या ऑटोमॅटिक व्हर्जनवर 35,000 रुपये आणि CNG व्हेरिएंटवर 65,000 रुपयांची सूट मिळत आहे. कारला 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्सच्या पर्यायासह 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळते.
मारुती सुझुकी स्विफ्ट
मारुती स्विफ्टला 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळते, ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सेस आहेत. त्याच्या मॅन्युअल वेरिएंटवर सुमारे 45,000 रुपयांची सूट मिळत आहे आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर त्याच्या CNG व्हर्जनवर 25,000 रुपयांची सूट मिळत आहे.
मारुती सुझुकी Eeco
Maruti Suzuki Eeco MPV वर या महिन्यात Rs 39,000 पर्यंत सूट मिळत आहे, तर त्याचे CNG आणि कार्गो व्हेरियंट Rs 38,000 पर्यंतच्या ऑफरसह ऑफर केले जात आहेत. मारुती Eeco मध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 73hp पॉवर जनरेट करते. 5 आणि 7 आसनांच्या लेआउटचा पर्याय आहे.
मारुती सुझुकी डिझायर
मारुती डिझायरच्या ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही प्रकारांवर रु. 17,000 ची ऑफर उपलब्ध आहे, परंतु त्याच्या CNG प्रकारावर कोणतीही सूट नाही. यात 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे, जे 90hp पॉवर जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय आहे.