केवळ 24 तासात आढळले 45 कोरोनाबाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यात सुरू झालेले कोविडचे संक्रमण आजही कायम आहे. असे असतानाही नागरिकांकडून अद्यापही कोविडचे तंतोतंत पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच ससंगमनेर तालुक्यात तब्बल 45 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालातून शहरापेक्षा ग्रामीण भागातील संक्रमणात दुप्पट वाढ झाल्याचे दिसत असून नागरिक अद्यापही मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावीत असल्याचे त्यातून दिसत आहे.

त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येच्या फुगवट्यात आजही वाढ झाल्याने तालुका आता 7 हजार 266 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. त्यातील केवळ 267 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील संक्रमणात मोठी होत असल्याचे दिसून येत आहे.

अचानक सुरू झालेल्या या संक्रमणामागे तालुक्यात झालेले काही लग्न सोहळे असल्याचेही यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र असे असताना आजही काही ठिकाणी नियम आणि कोविडची भीती दूर सारीत बिनधास्त कार्यक्रम, सोहळे आयोजित करत आहे.

दरम्यान गेल्या वर्षभरात कोविडच्या संक्रमणाने संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत 7 हजार 266 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात शहरातील 2 हजार 141 तर ग्रामीणभागातील 5 हजार 125 रुग्णांचा समावेश आहे.

आजवर तालुक्यातील 6 हजार 942 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून तालुक्यातील 57 रुग्णांचे आत्तापर्यंत बळी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचा तालुक्याचा सरासरी दर 95.77 टक्के आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe