श्रीगोंद्यात नाहाटा, पाचपुते यांच्या खेळीमुळे आघाडीचे झाले पाणीपत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते व बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा

यांनी आघाडीचे सदस्य फोडून भाजपच्या तंबूत दाखल केल्याने आघाडीकडून एकही फॉर्म भरला नसल्याने पाचपुतेंचे कट्टर समर्थक मनीषा शंकर कोठारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी जाहीर करताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कोठारे यांनी यापूर्वीही हे पद भूषवले आहे. त्यांना परत एकदा संधी देऊन पक्षाने त्यांच्या कार्याचा सन्मानच केला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नवनिर्वाचित उपसभापती मनीषा कोठारे यांचा माऊली या संपर्क कार्यालयात छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाचपुते यांनी नवनिर्वाचित उपसभापतींचे अभिनंदन केले.

खासदार सुजय विखे यांचा या विजयात मोलाचा वाटा असून बाळासाहेब नाहाटा, युवा नेते साजन पाचपुते, लक्ष्मण नलगे, रमेश गिरमकर व माजी सभापती पुरुषोत्तम भय्या लगड या सर्वांनी उल्लेखनीय काम केल्यामुळे विजयश्री खेचून आणण्यात यश आले, असे गौरवउद्गार पाचपुते यांनी काढले. यावेळी ज्ञानेश्वर विखे पाटील,

बाळासाहेब महाडीक, संदीप नागवडे, राजेंद्र उकांडे, पोपटराव खेतमाळीस, बापुतात्या गोरे, अशोक खेंडके, शहाजी भाऊ खेतमाळीस, अंबादास औटी,

प्रवीण कुरुमकर, नितीन नलगे, प्रतिभा गांधी तसेच पंचायत समिती सदस्य शहाजी हिरवे, जिजाबापू शिंदे, नाना ससाणे, सुरेश गोरे, रजनी देशमुख, आशा गोरे, प्रतिभा झिटे, दत्ता कोठारे, अमोल शेलार, रोहित गायकवाडसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe