वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज मैदानात,

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा आहे, असा आरोप करत भाजपाने मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. तर संजय राठोड यांच्या हकालपट्टीची मागणी केल्यामुळे बंजारा समाजाची बदनामी होत आहे.

त्यामुळे संजय राठोड यांच्या समर्थनार्थ महंत आणि बंजारा समाजाने एकत्रित येत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात रॅली काढत तहसिलदारांना निवेदन दिले आहे.

पुजा चव्हाण या २२ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्यानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच आहे, असा आरोप करत भाजपाने रान पेटवलं आहे.

तर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे बंजारा समाजाने एकत्रित येत पुजा चव्हाणला श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर पोहरादेवी येथील सुनिल महाराज आणि जितेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्री पुतळ्यापासून संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली व तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe