अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते स्वच्छतेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान स्वच्छतेच्या बाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्हा पोलीस उपधीक्षक प्रांजल सोनवणे व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.
ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाच्यावतीने डॉ. संतोष यादव, आयकर अधिकारी विकास गायकवाड हे उपस्थित होते.
शासकीय कार्यालये विभाग
- – १) प्रथम- जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ,
- २) द्वितीय-ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय ,
- ३) तृतीय- सहाय्यक आयुक्त आयकर कार्यालय
हॉस्पिटल
- – प्रथम -सुरभी हाॅस्पिटल,
- द्वितीय- बुथ हाॅस्पिटल ,
- तृतीय – मॅककेअर सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल,
शाळा विभाग
- – १) प्रथम -सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, तारकपूर
- , २) द्वितीय -शिवसामर्थ्य प्राथमिक विद्यालय, केडगाव ,
- ३) तृतीय -रुपीबाई मोतीलालजी बोरा, न्यू इंग्लिश स्कूल,
हाॅटेल विभाग
- – प्रथम- हाॅटेल औरस,
- २) द्वितीय- सिंग रेसिडेन्सी,
- ३) तृतीय -हाॅटेल अर्चना
ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |