हिरेन मृत्यूप्रकरणी महसूलमंत्री म्हणाले….मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसाह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीत सापडला.

या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी माध्यमांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या व पोलिसांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले मत व्यक्त करत पोलिसांची पाठराखण केली आहे. ‘सरकार बदलत असते पण मुंबई पोलिस तेच असतात. त्यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे.

राजकारणातून विरोधकांनी विरोध केला असला तरी पोलिसांवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे.मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे दिला आहे,

तो योग्य पद्थतीनेच होणार, याच शंका घेण्याचे कारण नाही.पोलिसांवर आरोप करणे चुकीचे आहे,’ अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरातयांनी व्यक्त केली.

हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कोणाकडे कसा द्यायचा हा गृह विभागाला अधिकार आहे. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला आहे.

ही घटना का घडली, कशी घडली, यासंदर्भात तपास होत आहे. हा तपास करण्यास राज्याचे पोलिस दल सक्षम आहे. असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News