नागरिकांचे रक्षण करणारी खाकी कोरोनाच्या विळख्यात; दुसऱ्या लाटेत 10 जणांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने कहर केला आहे. यामुळे लॉकडाऊन,, कठोर निर्बंध, नाकाबंदी यासाठी खाकी नेहमीच ऑन ड्युटी कार्यरत असत.

मात्र नागरिकांचे रक्षण करता करता खुद्द पोलीस विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना या विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये आतापर्यंत 15 पोलिसांचा मृत्यू झाला असून सर्वांधिक 10 मृत्यू करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये झाले आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे.

दरम्यान गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये करोनाचे सावट आले. 22 मार्च 2020 रोजी सरकारने जनता कर्फ्यूचे आवाहन केले.

त्या दिवसापासून जिल्हा पोलीस दलातील सुमारे तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. पहिल्या लाटेमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी लोकांच्या होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर होती.

फेब्रवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येऊन धडकली. या लाटेमध्ये करोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. यामुळे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांचा संपर्क थेट लोकांशी येत होता. रुग्णालये, अमरधाम येथेही पोलिसांना ड्यूटी करावी लागली.

या सर्वांमध्ये अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली. सुदैवाने दुसर्या लाटेच्या वेळी करोना लस आल्याने तात्काळ पोलिसांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे अनेकांना संसर्ग झाला तरी त्रास झाला नाही. तरीही जानेवारी ते मे या कालावधीत जिल्हा पोलीस दलातील 10 कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe