शेवटी ‘त्यांचा’ मृतदेहच आढळून आला ! …अन सर्व अशा अपेक्षांचा चक्काचूर झाला 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरातील व्यापारी गौतम हिरण हे मागील  सात दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा पोलिसांसह नातेवाईकही शोध घेत होते. तपास लवकर लागावा, यासाठी व्यापाऱ्यांनी शनिवारी बेलापूर गाव बंद ठेवले होते.

त्यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप बेलापूर ग्रामस्थांनी केला होता. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व दिशांनी त्यांचा तपास सुरू केला होता.

अपहरणकर्त्याच्या तावडीतून आपण त्यांची सुखरूप सुटका करू अशी मनाची तयारी करून सर्वजण त्यांचा तपास करत होते. परंतु हिरण यांचा तपास लागत नव्हता. अखेर  एमआयडीसी शिवारात यशवंतबाबा चौकीजवळ रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेहच आढळून आला.

कुजल्यामुळे मृतदेहाची ओळख पटणे अवघड झाल्याने खिशातील कागदपत्रांच्या आधारे कुटुंबियांनी हिरण यांची ओळख पटवली. दि. १ मार्च रोजी बेलापूर येथील बायपासवरून हिरण बेपत्ता झाले होते. त्यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप बेलापूर ग्रामस्थांनी केला होता.

त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व दिशांनी त्यांचा तपास सुरू केला होता. बेलापूर ग्रामस्थांनी निवेदन देऊन गावही बंद ठेवले होते. या प्रकरणी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार लहू कानडे यांनीही आवाज उठवला होता.

त्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षक मनोज  पाटील यांनी बेलापूर येथे येऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तपास अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पोलिसांनी देखील  हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले होते. तपासादरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांनी वर्णन केलेल्या अपहरणासाठी वापरण्यत आलेल्या व्हॅनचाही तपास केला; मात्र त्यात काही तथ्य आढळून आले नाही.

अखेर त्यांचा मृतदेह काल रविवारी सकाळी एम.आय.डी.सी. शिवारात यशवंतबाबा चौकीजवळ रेल्वे रुळाजवळ आढळून आला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह तपास घटनास्थळी भेट दिली.

यावेळी फॉरेन्सिक विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पंचनामा केल्यानंतर मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

बेलापूर व श्रीरामपूरातील व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान हिरण यांचा खून झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र अधिकृतरित्या अजून काही समोर आलेले नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe