पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नगर शहरातील एमआयडीसी परिसरात मजुरीचे काम करणाऱ्या पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात बलात्कारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जूनला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

परप्रांतातून एमआयडीसी परिसरात कामासाठी आलेल्या व्यक्तीने राहत्या घरी स्वतःच्याच १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला.

पतीच्या या कृत्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

त्यानुसार आरोपी विरोधात बलात्काराचा तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe