गेल्या 24 तासात तिघांचा मृत्य तर 174 जण कोरोनामुक्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यातील 174 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या 72 हजार 943 इतकी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी एक दिलासादायक वार्ता म्हणजे जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 97.29 टक्के इतके झाले आहे.

बुधवारी रुग्ण संख्येत 176 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 898 इतकी झाली आहे. दरम्यान बुधवारी करोनामुळे तिघाजणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 हजार 132 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्टलॅबमध्ये 49, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 114 आणि अँटीजेन चाचणीत 13 रुग्ण बाधित आढळले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe