अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना व्हायरसची तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे, तिसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे पाच लाख रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत या लाटेची तीव्रता सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहेत. या अहवालात तीन महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
१५ जुलैपर्यंत संपूर्ण देशातील लॉकडाऊन उठवला जाण्याची शक्यता आहे. अनलॉक झाल्यानंतर जानेवारीत ज्याप्रमाणे परिस्थिती होती, तशीच परिस्थिती जुलैतही निर्माण होण्याची शक्यता आहे.
अनलॉकमध्येही नागरिकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केले, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत, सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय प्रवास केला, तर हा बेजबाबदारपणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या लाटेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये उच्चांकी रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या विषयातील जाणकारांनीही याला दुजोरा दिला आहे. या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे,
त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कोरोनाची स्थिती अधिकग भयावह होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नव्या म्यूटेंटसह, तिसरी लाट आली, तर त्याची परिणामकता अधिक घातक असण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम