अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव मंडळाच्या व शांतता कमिटी च्या पदाधिकाऱ्यांची बैठक कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती,
या बैठकीमध्ये एक गाव एक गणपती चा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे,मागील वर्षी पासून सुरू झालेले कोरोनाचे संकट पाहता माहील वर्षी एक गाव एक गणपतीची संकल्पना यशस्वी झाली होती, यंदाही कोरोनाचे संकट असल्याने याचा प्रादुर्भाव शहरासह परिसरात वाढू नये यासाठी कोपरगावकर काळजी घेताना दिसत आहे,
त्याचप्रमाणे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक-गाव एक गणपतीची संकल्पना अमलात आणण्याचे निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे. गणेश मूर्तीची स्थापना कोठे करायची याबाबत प्रशासनाचे प्रमुख अधिकारी निर्णय घेणार आहे,या बैठकीसाठी तहसीलदार योगेश चांद्रे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,नगराध्यक्ष विजय वाहडणे,नगर अभियंता दिगंबर वाघ,मसेबी चे अभियानाता अतुल खंदारे,तसेच भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर डडीयाल,नगरसेवक कालू अप्पा आव्हाड,माहेमुद सय्यद,भाजपचे विनोद राक्षे,म
नसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,सुनील फंड,सुशांत खैरे , बाळासाहेब रुईकर,मावळा ग्रुपचे संस्थापक फिरोज पठाण,रवी रोहमारे,विकी जोशी, रवी कथले,सिध्दर्थ शेळके,दिनेश आदमणे,स्वच्छता दूत सुशांत घोडके, तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम