‘या’ शहरात कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसचा धुमाकूळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- कोरोना पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा देखील वाढतच चालला आहे. शुक्रवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला असून, मृत्यूची संख्या १२१ वर पोहचली आहे.

नवीन १९ रुग्ण दाखल झाल्यामुळे रुग्णांचा आकडा १ हजार २० इतका झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे. म्युकरमायकोसिसच्या आजाराने आता विळखा घालण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शहरासह ग्रामीण व मराठवाडयातील इतर जिल्हयातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार केले जात आहे.

उपचाराचा खर्च अधिक असल्याने अनेक रुग्णांनी उपचारविना काढता पाय घेतला आहे. तर अनेक रुग्णांनी उपचारासाठी कर्ज व व्याजाने रक्कम घेत आहे. शहरातील रुग्ण संख्या कमी असलीतरी ग्रामीण व इतर जिल्हयातून दाखल होणाठया रुग्णांमुळे ही संख्या वाढत आहे.

प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शुक्रवारी नवीन १९ रुग्ण दाखल झाल्यामुळे रुग्णांची संख्या १ हजार २० इतकी झाली आहे. तसेच दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १२१ वर पोहचली आहे. अ­ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २५५ इतकी आहे.

२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आतापर्यंत ६४४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe