कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  नगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकानिहाय आढावा घेत कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील करोनाच्या रूग्ण संख्येत 559 ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 546 इतकी झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

यातच करोनाचा फैलाव वाढण्यात गर्दी कारणीभूत ठरत असल्याने जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालयवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

हॉटेल चालकांनी 50 टक्के क्षमतेनेच ग्राहकांना प्रवेश द्यावा, अन्यथा हॉटेल बंद करण्याची कारवाई करावी लागेल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

दरम्यान, वाढत्या करोना रुग्णांचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. काल जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, आरोग्य यंत्रणेतील अधिकार्‍यांची बैठक घेऊन वाढत्या रुग्ण संख्येमुळे तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गर्दीच्या ठिकाणे असणारे हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरंट चालकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा ते बंद करण्याचा इशाराच दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!