पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे.

दक्षिण दिनाजपूर भागातील एका सभेत जनतेला संबोधित करताना कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले.

देशभरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या महत्वपूर्ण घोषणेमुळे पश्चिम बंगालमधील नागरिकांमध्ये दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

५ मेपासून राज्यातील १८ वर्षांवरील पात्र असणाऱ्या सर्वांना कोरोना लस पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे, असे ममता यांनी जाहीर केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या पुर्वीच राज्यातील जनतेला मोफत कोरोना लसीकरण करण्याबाबत आश्वासन दिले होते.

राज्यातील गरजू नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल अशी घोषणा केली होती.

राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच या बाबत घोषणा केली जाईल असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.

यानंतर आज ममतांनी राज्यातील जनतेला दिलेला शब्द पाळत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe