नाशिक जिल्ह्यातील घटना : तो मुलगा आणि त्याची आई आता कधीच परतणार नाही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या कारणातून ३२ वर्षीय महिलेने पोटच्या तीन वर्षीय मुलाचा उशीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे, महिलेने गळफासही घेतला आहे. प्ले स्कूलचा अभ्यास करत नसल्याचा राग अनावर झाल्यानं एका आईनं पोटच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर आईनं गळफास घेऊन आत्महत्या केली.

रिधान असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे तर शिखा सागर पाठक असं मुलाची हत्या आणि त्यानंतर आत्महत्या करणा-या आईचं नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरात ही मन सुन्न करणारी घटना घडलीय. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आलीय. पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात मुलाचा खून करून एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केलीये. 32 वर्षीय महिलेचे नाव शिखा सागर पाठक असे आहे राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून या महिलेने हा प्रकार केलाय.

आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. साडेतीन वर्षांचा रिधान ऑनलाईन अभ्यास करत नव्हता.

त्या कारणातून शिखा पाठक हिने रिधानचा खून करून स्वतः आत्महत्या केली, असा जबाब सागर पाठक व त्याच्या आईवडिलांनी पोलिसांना दिला आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!