अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-महावितरणच्या अहमदनगर शहर व ग्रामीण विभाग अंतर्गत असलेल्या तेलीखुंड शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता व जनमित्र यांना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री कार्यालयात झालेली मारहाण ही निंदनीय आहे.
या घटनेमुळे अभियंते व कर्मचाऱ्यांनी खचून जाऊ नये. सदर घटनेचा मी निषेध करीत असून याचा परिणाम ग्राहकांच्या सेवेवर पडू देवू नये, प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
तेलीखुंट येथे रात्रपाळी ड्युटीवर असणारे कर्मचारी प्रकाश शेळके, बापूसाहेब बडेकर आणि सहाय्यक अभियंता राजेंद्र पालवे यांना निखिल धंगेकर या व्यक्तीने शुक्रवारी रात्री कार्यालयात घुसून मारहाण केली होती.
सदर आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी आज तेलीखुंट कक्ष येथे प्रत्यक्ष भेट दिली व सर्व कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
त्यांच्याकडून झालेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करीत या घटनेची विस्तृत माहिती घेतली. तसेच पोलिस प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला असून आरोपीला अटक केली आहे.
कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून मारहाणीसारखे प्रकार करतात अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांना कठोर शिक्षा व्हावीत यासाठी प्रशासनाच्या वतीने पुर्णपणे प्रयत्न करण्यात येत असून,
महावितरण प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून महावितरण कर्मचाऱ्यांना कायम संरक्षण देण्यासाठी विचार करण्यात येईल असेही ना.तनपुरे म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved