अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेना, भाजप नंतर आता मनसे मधून काँग्रेसमध्ये इन्कमिंग झाले आहे. मनसे उपशहर प्रमुख ऋतिक लद्दे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.
आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यामध्ये आ. कानडे यांनी लद्दे आणि समर्थकांचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले. जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे नुकताच हा प्रवेश पार पडला. ऋतिक लद्दे हे सावेडी उपनगरातील युवा नेतृत्व असून ते मनसेचे उपशहर प्रमुख होते.
त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. यावेळी ऋतिक लद्दे यांच्यासह अक्षय बरकासे, सौरव सोनार, शुभम आव्हाड, नईमुदिन शेख, वैभव तिजारे, आनंद शिंदे, किरण नेटके, सुयोग अडगल, अनाता पालवे, समीर अत्तार, अविनाश जाधव, सोहेल शेख, विजू थोंबे, सौरभ कांबळे, शफीक शेख, धनंजय गायकवाड आदींसह युवकांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी आ.कानडे, काळे यांच्यासह जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस नेते फारुक शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट,
अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, मागासवर्गीय विभाग शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, एससी विभाग प्रदेश समन्वयक संजय भोसले,
प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, लोकेश बर्वे, उमेश साठे, अभिनय गायकवाड, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, क्रीडा शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे, क्रीडा विभाग खजिनदार नारायण कराळे, शरीफ सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. लहू कानडे म्हणाले की, नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे संघटन मजबूत झाले आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काळे यांच्या रूपाने नगर शहराला एक सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि विकासाचे व्हिजन असणारे युवा नेतृत्व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे.
किरणभाऊ नगरकरांच्या प्रश्नांवर संघर्षातून आवाज उठवत काम करीत आहेत. मला विश्वास आहे कि मनसेतून काँग्रेसमध्ये आलेल्या नव्या दमाच्या सर्व सहकाऱ्यांना ताकद देण्याचे काम किरणभाऊ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करतील. जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, ऋतिक लद्दे युवा आहेत. त्यांचे सावेडी उपनगरासह शहराच्या विविध भागांमध्ये मोठे संघटन आहे.
काँग्रेस पक्षात त्यांच्या प्रवेशाने निश्चितच संघटनात्मक भर पडली आहे. नगर शहरातील अनेक कार्यकर्त्यांना, विशेषतः युवा वर्गाला काँग्रेस हा आता भरवशाचा पक्ष वाटत असून त्यामुळेच पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. लद्दे यांना पक्षात मानाचे स्थान दिले जाईल. त्यांची संघटनात्मक जबाबदारी आगामी काळात वाढवली जाईल, अशी ग्वाही यावेळी बोलताना काळे यांनी दिली.
ऋतिक लद्दे म्हणाले की, किरण काळे हे नगर शहरातील निर्भीड आणि सर्वसामान्यांचे हक्काचे नेते आहेत. ते कोणालाही आणि सहजपणे उपलब्ध असतात. सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत सहजपणे आपले काम घेऊन पोहोचू शकतो. त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन मी माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेत काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत करत असताना ना. थोरात यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे किरणभाऊंना विधानसभेत पाठवण्यासाठी युवकांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी करण्यासाठी मी व माझे सर्व तरुण सहकारी काम करणार आहेत असे यावेळी लद्दे म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लोकेश बर्वे यांनी केले. आभार प्रवीण गीते यांनी मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम