अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- गंगापूर दारणाच्या पाणलोटात पावसाने हजेरी लावली. गंगापूर धरणात शनिवारी दिवभरात 76 दलघफू नविन पाणी दाखल झाले. यामुळे या धरणात 87.21 टक्के पाणी साठा झाला होता.
तर दारणाचा साठा 84.67 टक्के इतका होता. मुकणे 57.67 टक्के, कडवा 85.90 टक्के, असा पाणी साठा होता. भावली, भाम , वालेदेवी, आळंदी हे धरणं 100 टक्के भरली आहेत.

दारणात मागील 24 तासात 132 दलघफू नविन पाणी दाखल झाले. शनिवारी सायंकाळी आळंदी धरणही ओव्हरफ्लो झाले. या धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरु झाला आहे.
या आळंदी या लघु प्रकल्पात 816 दलघफू पाणी साठा आहे. दारणातुन 150 क्युसेक, भावलीतुन दारणात 135 क्युसेक, वालदेवीतुन गोदावरीकडे 65 क्युसेक, तर गोदावरीत नदीत नांदूरमधमेश्वर बंधार्यात 1211 क्युसेक ने विसर्ग स्थिर आहे.
पालखेडचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. पालखेड धरणात 75.19 टक्के पाणी साठा आहे. गंगापूरच्या भिंतीजवळ 30 मिमी, कश्यपी ला 21 मिमी, गौतमी ला 8 मिमी, त्र्यंबकला 10मिमी,
तर आंबोलीला 16 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरचासाठा काल सायंकाळी 5 वाजता 87.21 टक्के, काश्यपी 59.82 टक्के, गौतमी चा 70.60 टक्के असे साठे झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













