अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्त्वाचे आहेे.
सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. ७० टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबतच्या ऑनलाइन बैठकीत दिले.
पंतप्रधान म्हणाले, आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत दोन हात करायचे आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पंजाबमध्ये कोरोनाच्या लाटेने पहिली उसळी पार केली आहे.
हे एक मोठे संकट आहे. काही राज्यांत प्रशासनाने हे हलक्यात घेतले आहे. लोकांनी सजग रहायला हवे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल, परंतू कोरोना चाचणीची संख्या वाढवा, कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांचा शोध आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे गरजेचे आहे.
युद्धपातळीवर हे काम करण्याची गरज आहे. आपल्याला आता पुरेसा अनुभव आलेला आहे. तसेच सोबत अन्य स्त्रोतांसह लसही आहे, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|