म्युकरमायकोसिसचा धोका वाढला,डॉक्टरांकडून ही भीती व्यक्त..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. मुंबईत मंगळवारीच एकाचा बळी गेला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असतानाच आता डॉक्टरांसमोर एक वेगळीच अडचण उभी ठाकली आहे.

मुंबईसह राज्यात म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनची टंचाई भासू लागली आहे. ‘अँफेटेरीसिन बी’ आणि ‘इसावूकोनाझोल’ या इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशात-राज्यात निर्माण झाला आहे.

वेळेत रुग्णाला इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचा धोका वाढण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. हे इंजेक्शन सरकारने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, आणि रुग्णांना वाचवावे अशी मागणी आता डॉक्टरांकडून केली जात आहे.

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, यात रुग्णांना डोळे, टाळू गमवावी लागते. तर वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतात. इतका गंभीर असा हा आजार आहे. या आजाराचा मृत्युदर ६० ते ८० टक्के आहे. यावरून हा आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते.

दरम्यान हा आजार ४० ते ५० वर्ष जुना आहे. तर देशात-राज्यात या आजाराचे रुग्णही आतापर्यंत खूप कमी आढळत होते. पण कोरोना काळात मात्र या आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनामुक्त मधुमेही रुग्णांना या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले होते.

पण त्यावेळी हे प्रमाण कमी होते. दुसऱ्या लाटेत मात्र या आजाराने कहर माजवला आहे. मागील एक-दोन महिन्यांत अशा रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. सरकारच्या चार दिवसांच्या आकडेवारीनुसार म्युकरमायकोसिसचे २००० हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News