अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कायमच दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात यावेळी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बीड सह गेवराई तालुक्यातील गावतील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे.
यातच नेवासा तालुक्यातील भेंडा, देवगाव, देडगाव परिसरातील ऊस बेण्याला बीड-गेवराई मधील शेतकऱ्यांची मोठी मागणी होत आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा, तेलकुडगाव, दहीगाव, देडगाव, देवगाव ही गावे ऊसाचे आगार म्हणून सर्वांना परिचित आहे.
उत्तम प्रतीचा ऊस उत्पादित करण्यात या गावातील शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ऊस लागवड करतांना शेतकरी सर्व प्रथम या गावातील ऊसाला प्राधान्य देतात. दरम्यान बीड-गेवराई व नेवासा तालुक्यातील काही गावामधे बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ऊस लागवडीला वेग आलेला आहे.
रोग विरहित आणि श्वासवत उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून ऊस पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळेच ऊस लागवडीला वेग आलेला आहे. ऊस लागवडीसाठी बेणे निवडतांना ऊसाचे वय, गुणवत्ता,उगवण क्षमता हे निकष लावले जातात.
हे सर्व निकष भेंडा, देवगाव, देडगाव या गावतील ऊस बेण्यात असते. त्यामुळे ऊस बेणे विक्री-खरेदीकरीता भेंडा परिसरात येतात.
दरदिवशी 400 टनाहुन अधिक ऊस येथे विक्रीसाठी येतो. ज्यांना बेणे हवे आहे ते शेतकरी याठिकाणी येतात आणि आपल्या मनपसंतीचे ऊस बेणे निवडून ते विकत घेतात. या ठिकाणाहून सध्या दररोज 400 टनांपर्यंत ऊसाची बेण्यासाठी विक्री होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम