धरणात कोसळले भारतीय सौन्याचं हेलिकॉप्टर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- भारतीय लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला जम्मू कश्मीरमधील कठुआ भागात अपघात झाला आहे. अपघात झाल्याने हे हेलिकॉप्टर रंजीत सागर धरणामध्ये कोसळले. अपघाताचे कारण समजू शकले नाही. तसेच, या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक प्रवास करत होते आणि ते लोक नेमके कोण होते, ते कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी निघाले होते?

याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान अपघाताची माहिती कळताच एनडीआरएफचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.20 च्या सुमारास भारतीय लष्कराच्या 254 आर्मी एव्हीएन स्क्वाड्रनच्या हेलिकॉप्टरने मामुन कॅंपमधून उड्डाण केले.

हेलिकॉप्टर धरण परिसराजवळ कमी उंचीचा फेरा घेत होतं, त्यानंतर ते धरणात कोसळले. अपघातानंतर एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली असून बचाव कार्य सुरू आहे. तर स्कुबाडायव्हर्सच्या मदतीने तलावात शोध मोहीम राबवली जात आहे.

आर्मीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत सागर धरणात कोसळलेल्या आर्मी एव्हिएशन एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. दरम्यान, या वर्षात लष्कराच्या हेलिकॉप्टरला घडलेला हा दुसरा अपघात आहे.

या वर्षाच्या अगदी सुरुवातीसही भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. यात असलेल्या दोन पायलटपैकी एकाचा मृत्यू झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe