गोदावरी पात्रात आवक वाढली, पावसाने जोर धरल्यास गोदावरी नदीला पूर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत आहे. त्यामुळे गंगापूर धरणात ७७ टक्के, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात ९६ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली.

वालदेवी व भावली ही धरणे शंभर टक्के भरली, तर गिरणा धरण ३९ टक्के भरले आहे. गिरणा धरण समूहात ५३ टक्के जलसाठा झाला.

मात्र, कोपरगाव तालुक्याच्या परिक्षेत्रात अद्यापही म्हणावा असा पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. पेरणी झालेली पिके माना टाकत आहेत, तर काहींकडे जेवढे पाणी आहे, तेवढे उपसा करून दिले जात आहे.

दरम्यान, दारणा धरणातून १ हजार ८९६ क्युसेक, नांदूर-मधमेश्वर धरणातून ३ हजार २२८ क्युसेक, भावली धरणातून १३५ क्यसेक, वालदेवी धरणातून २४१ क्यूसेक वेगाने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडले जात आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असून पावसाने जोर धरल्यास गोदावरी नदीला पूर येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe