शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन ..!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्­नाकडे दुर्लक्ष केल्याने निर्माण झालेल्या शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकदिनी राज्य सरकारला स्मरणपत्र देण्याचा इशारा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बोडखे यांनी आमदार गाणार व शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून चर्चा केली.

केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळालेला नाही. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर यांच्या भविष्य निर्वाह निधीची बी.डी.एस. प्रणाली बंद करुन शिक्षक व कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी शासनाने केली आहे.

तसेच दरमहा प्रत्येक जिल्ह्याला अपुरे वेतन अनुदान देण्यात येत आहे. अंशत: अनुदानित शाळांना टप्पा वयानुरूप अनुदान दिले जात नाही. या सर्व प्रकाराने शिक्षक व कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे.

याबाबत पाठपुरावा सुरू असून यावर लवकरात लवकर तोडगा काढवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe