लोकशाही सदृढ होण्यासाठी युवकांसह प्रत्येक नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा -अतुल फलके

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने गावात नवीन मतदारांसाठी नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाचा शुभारंभ गावचे सरपंच रुपाली जाधव यांच्या हस्ते झाले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, विक्रम कदम, संजय जाधव, अजित फलके, उध्दव फलके, अरुण अंधारे, रामदास पवार, हुसेन शेख, सुधीर खळदकर, अशोक जाधव, ज्ञानेश्‍वर जाधव, बाळू डोंगरे आदी अतुल फलके म्हणाले की, लोकशाही सदृढ होण्यासाठी युवकांसह प्रत्येक नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा आहे.

भारत हा युवकांचा देश असून, युवकांनी जागृकतेने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे. शंभर टक्के मतदान झाल्यास खर्‍या अर्थाने लोकशाही असतित्वात येणार असून, यासाठी नवमतदारांची नाव नोंदणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

गावातील 18 वर्षापुढील युवक-युवतींचे मतदार यादीत नांव समाविष्ट होण्यासाठी मतदान नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात नव मतदारांना नांव नोंदणीसह ग्रामस्थांना मतदान यादीतून नाव कमी करणे, एकाच मतदार संघात नाव स्थलांतरीत करणे, नाव, वय व पत्ता दुरुस्तीसाठी अर्ज भरुन घेण्यात आले.

बीएलओ उत्तम कांडेकर, निळकंठ वाघमारे, दिपक जाधव, नवनाथ फलके यांनी मतदार नोंदणीचे कामकाज पाहिले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी केले. आभार अरुण अंधारे यांनी मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe