आयपीएल : कर्णधाराने तिसऱ्यांदा चूक केल्यास ३० लाख दंड अन‌् एका सामन्याची बंदी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-नवे सहकारी, नवी जर्सी, संघाचे बदलेले नाव,नवीन नियम, अशा वातावरणात आयपीएलचा चौदाव्या हंगाम ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या नवीन हंगामासाठी नवीन नियमावली तयार केली आहे.

सॉफ्ट सिग्नलला हटवून 90 मिनिटांत 20 षटके पूर्ण करण्याचा नियम राहील.षटकांची गती राखता आली नाही तर संबंधित संघाच्या कर्णधाराला एका सामन्याची बंदीची शिक्षा होईल. नियमावलीनुसार तीन सामन्यांत षटकांची गती राखता आली

नाही तर कर्णधारावर एका सामन्यावर बंदी घालण्याची तरतूद बोर्डाने केली आहे. पहिल्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 12 लाख, दुसऱया चुकीसाठी 24 लाख आणि तिसऱयांदा पुन्हा चूक झाल्यास 30 लाख रुपये अशी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

तिसऱ्या चुकीमुळे 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशा दोन शिक्षा कर्णधाराला होणार आहेत. सामन्याची वेळ ते सुपर ओव्हरच्या नियमातही बदल झाला.

गतविजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तुल्यबळ संघातील लढतीने 9 एप्रिलला ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

आयपीएलच्या 14 व्या हंगामाचे 120 देशांत थेट प्रक्षेपण होणार आहे. भारतातीलतील 8 भाषांत या स्पर्धेचे धावते समालोचन दाखवले जाणार आहे. यात हिंदी, इंग्रजी, तामीळ, तेलुगू, बंगाली, कन्नड, मराठी व मल्याळम या भाषांचा समावेश आहे.

चेन्नई व मुंबईच्या संघांनंतर आता पंजाब संघानेही आपल्या जर्सीत बदल केला. संघ मालकांनी नव्या नावासह मंगळवारी जर्सी जाहीर केली. पंजाब संघाच्या जर्सीचा मूळ रंग लाल आहे. त्यावर सोनेरी रंगाची पट्टी आहे. टी-शर्टच्या समोरील भागात सिंहाचे चित्र आहे.

खेळाडू यंदाच्या सत्रात सोनेरी रंगाचे हेल्मेट वापरणार आहेत. फेब्रुवारीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव बदलून पंजाब किंग्ज असे नवे नाव ठेवण्यात आले आहे.

असे आहेत नवे नियम सुपर ओव्हर

  • – विनाअडथळा मॅच बरोबरीत राहिल्यानंतर सामना संपल्यापासून ते तासाभरात सुपर ओव्हर. नो बॉल
  • – यादरम्यान मैदानावरील पंचांनी दिलेला नो बॉलचा निर्णय हा परिस्थितीनुसार तिसरे पंच बदलू शकतील. शॉर्ट रन
  • – थर्ड अंपायर हे शॉर्ट रन तपासणार आहेत. आता त्यांच्याकडे मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्याचा एक पर्याय असेल.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News