अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यासह, मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची कुठलेही पूर्वसूचना न देता वीजतोडणी मोेहीम वीज वितरण कंपनीने सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल आहे.
असे असतानाही तालुक्याचे आमदार कुंभकर्णी झोपेत आहेत का? वितरण कंपनीने ही मोहीम थांबवावी, अन्यथा जन आंदोलन उभे करून उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला. कोरोनामुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि शेतकऱ्यांची पण हीच परिस्थिती आहेत. कोरोनाच्या कालावधीत वीजबील वाढीव आले.
त्यात शेतकऱ्यांना, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांना देखील अव्वाच्या सव्वा बिले दिल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना, संकटाला सामोरे जावे लागत आहे. थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे.
गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची विज तोडणी थांबविण्यासाठी विद्यामान आमदारांनी पुढाकार घेण्याची गरज असताना देखील त्यांनी या विषयाकडे पाठ फिरवून आपल्या नेहमीप्रमाणे फोटोसेशनमध्ये मग्न झाले.
वीज वितरण कंपनी बरोबर विद्यमान आमदारांना देखील कंभकर्णाच्या झोपेतून बाहेर काढावे लागणार आहेत. सत्ताधारी सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकत नाही, त्या सरकारचा आणि आमदाराचा काय उपयोग? दरम्यान, कोरोनामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. संपूर्ण देशात शेती हा एकमेव व्यवसाय सुरू होता. कठीण काळात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला हे राज्य सरकार विसरलेले आहेत. जगाच्या पोशिंद्यावर अन्याय न करता त्यांना न्याय द्या त्याचबरोबर वीज तोडणी थांबवावी, अशी मागणी रोहोम यांनी केली.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved