गरोदर स्त्रियांसाठी लस सुरक्षित आहे कि नाही ? वाचा महत्वाची बातमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- “गरोदर महिलांना कोरोनाची लागण झाली तर त्याचे परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ शकतात. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत.

गरोदर महिलांनी लस घेतली पाहीजे. लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाल्यास वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त आहे. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे”, असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं.

गरोदर महिला कोविनवरून बुकिंग किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात,असंही त्यांनी पुढे सांगितलं. सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गरोदर महिलांनी घेतली पाहिजे. देशात करोना प्रादुर्भाव सुरु आहे.

अशा काळात गरोदर माता आणि बाळांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. गरोदर महिलांनी लस घेतल्यास संरक्षण मिळू शकते. देशात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. यासाठी १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण केलं जात आहे.

गरोदर आणि स्तनदा मातांना २ जुलैपासून कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी गरोदर महिलांनी लस घ्यावी, की नाही ? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते.

निति आयोग सदस्य डॉ. पॉल(Paul) यांनी याबाबतचा संभ्रम दूर करत गरोदर महिलांनी कोरोनाची लस घ्यावी, असं आवाहन केलं आहे. लस घेतल्याने गरोदर महिला आणि बाळाला सुरक्षा मिळेल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही लस गरोदर महिल्यांसाठी सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe