अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-देशात नवा मोदी कायदा आला आहे का, त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्यपालांकडे आहे का, आला असेल त्याची आम्हालाही माहिती द्यावी, असा टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या प्रकरणावरून मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने केली आहे, त्याला मंत्री मलिक यांनी प्रत्युत्तर दिले.रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
त्यावरून भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. भाजपाच्या नेत्यांनी मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करून ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले.
त्यानंतर मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊ न त्यास उत्तर दिले.मंत्री मलिक म्हणाले, राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना काही कंपन्या राज्य सरकारला रेमडेसिवीर द्यायला तयार नव्हत्या. ब्रुक फार्माला महाराष्ट्र सरकारच्या एफडीएने परवानगी दिली होती.
मात्र, ही कंपनी केंद्रशासित दमणमध्ये रेमडेसिवीरची निर्मिती करते. तेथील प्रशासनाने महाराष्ट्राला पुरवठा करता येणार नाही, असे निर्बंध त्यांच्यावर घातले होते. त्यामुळे केंद्र सरकारकडून अडवणूक होत असल्याचा मुद्दा आपण मांडला होता.
या प्रकणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंर्त्यांशी चर्चा केली. हा विषय आम्ही राजकारणासाठी घेतलेला नाही. लोकहितासाठी आम्ही बोलत आहोत. मात्र, कोरोना संकटाचा फायदा घेणे आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.
मी हा मुद्दा लावून धरल्यामुळे माझ्यावर टीका करणे सुरू आहे. राजीनाम्याची मागणी होत आहे.जावयाला अटक झाल्यामुळे मलिक केंद्र सरकारच्या विरोधात बोलत असल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले होते.
यावर मलिक म्हणाले, महाराष्ट्राची जनता सर्व जाणते. माझ्या जावयाचा विषय कोर्टात आहे. कायदा सर्वांना सारखा आहे. मी कधीच दबावाखाली बोलत नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|