आता हेच राहील होत ? ! CNG च्या दरातही झालीय वाढ; आजपासून नवे दर…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अलीकडे पेट्रोलने 100 रूपयांचा आकडा पार केला. डिझेलच्या दरांत देखील सतत वाढ होत आहे. इंधनांच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत , शिवाय महिन्याचं गणित देखील बिघडलं आहे.

आता त्यामध्ये अधिक भर पडणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि LPG सिलेंडरनंतर आता CNG आणि PNGच्या दरांत वाढ करण्यात आली आहे CNG च्या किंमतीत 90 पैसे प्रति किलोग्रामने वाढ झाली आहे.

IGLने दिलेल्या माहितीनुसार, CNGगॅसचे दर 43.40 रूपये होते तर आता त्यासाठी 44.30 रूपये मोजावे लागणार आहेत.

तर दुसरीकडे PNG चे दर देखील वाढले आहेत. दिल्लीत PNGसाठी आता 29.66 रूपये मोजावे लागणार आहेत. हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!